Maharashtra Vanrakshak Bharti Selection Process 2025 | महाराष्ट्र वनरक्षक भरती सिलेक्शन प्रोसेस 2025

Maharashtra Vanrakshak Bharti Selection Process 2025 | महाराष्ट्र वनरक्षक भरती सिलेक्शन प्रोसेस 2025

Vanrakshak Bharti Selection Process 2025 Maharashtra – महाराष्ट्र वन विभागाच्या वनरक्षक भरती साठी 2025 मध्ये फार्म भरायचा असेल. तर हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. या वनरक्षक भरतीसाठी उमेदवारांची निवड कशा प्रकारे होते. कारण ही प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यांनी घेतली जाते महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक टप्पा पार करणे आवश्यक असते. ज्या उमेदवारांना या विविध टप्प्यांबद्दल माहित नसते. किंवा जे उमेदवार नवीन असतात त्यांना ही प्रक्रिया जाणून घेणे. वन विभाग भरतीसाठी शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, मेडिकल, आणि अंतिम निवड या Van Vibhag Bharti Maharashtra 2025 Selection Process बद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vanrakshak Bharti Selection Process 2025

If you want to apply for the Maharashtra Forest Department Forest Guard Recruitment 2025, it’s important to understand the selection process, which takes place in multiple stages. Clearing each stage is mandatory. New or unaware candidates must know this process. The Van Vibhag Bharti Selection Process includes: Physical Test, Written Exam, Medical Examination, Final Selection Detailed information about each stage is given below.

वन विभाग वनरक्षक भरती सिलेक्शन प्रोसेस | Van Rakshak Selection Process

जसे की, तुम्हाला आधी सांगितलं वनरक्षक भरती सिलेक्शन प्रोसेस विविध टप्प्यांनी होते. ते विविध टप्पे व त्याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

  1. ऑनलाईन परीक्षा (MCQ Test)
  2. कागदपत्रे पडताळणी (Documents Verification)
  3. शारीरिक चाचणी (Physical Test)
  4. अंतिम निवड (Final Selection)

📌 हे पण वाचा – पोलिस भरती महाराष्ट्र संपूर्ण माहिती

वनरक्षक भरती लेखी परीक्षा | Vanrakshak Bharti Written Test

महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरती परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीची परीक्षा होईल. ती परीक्षा 120 गुणांची असून एकूण 60 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील. ऑनलाइन परीक्षा मध्ये खालील प्रमाणे 4 विषयांना घेऊन देण्यात येतील.

अ क्र विषय प्रश्न गुण
1 मराठी 15 30
2 इंग्रजी 15 30
3 सामान्य ज्ञान 15 30
4 बौद्धिक चाचणी 15 30
एकुण  60 120

वन विभाग भरती कागदपत्रे |Van Rakshak Forest guard Documents Verification

महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरती कागदपत्रे पडताळणीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे प्रपत्र अ नुसार खाली देण्यात आले आहेत. जर का उमेदवार माजी सैनिक, खेळाडू, अंशकालीन पदाचे उमेदवार, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, रोजनदारी मजूर, होमगार्ड, अनाथ असल्यास त्या उमेदवाराला ते सर्टिफिकेट प्रमाणपत्र द्यावे लागेल.

1. आधार कार्ड/पॅन कार्ड/मतदान कार्ड, यापैकी कोणतेही एक

2. उमेदवाराने ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत व वर्तमान 5 पासपोर्ट फोटो.

3. जन्मतारखेचा पुरावा SSC किंवा HSC प्रमाणपत्र

4. 12 वी Science (गणित भूगोल किंवा अर्थशास्त्र या विषयांसह पास असावे)

5. जातीचा दाखला (caste certificate)

6. जात वैधता प्रमाणपत्र (caste validity certificate)

7. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट (Non creamy layer certificate)

8. महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (domicile certificate)

9. उमेदवार आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असल्यास (EWS Certificate)

10. उमेदवार खेळाडू असल्यास ( sport certificate)

11. होमगार्ड असल्यास 3 वर्ष सेवा सर्टिफिकेट

12. इतर उच्च शैक्षणिक पात्रता असल्यास प्रमाणपत्र

13. लग्न झाले असल्यास लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र

14. सरकारी दवाखान्याचे मेडिकल सर्टिफिकेट

 

📌 हे पण वाचा  – वन विभाग भरती 2025 सिलॅबस

 

वन विभाग भरती शारीरिक चाचणी | Van Rakshak Bharti Physical Test

शारीरिक चाचणीसाठी पात्र असलेल्या उमेदवाराने खालील प्रमाणे उंची छाती व वजन निकष पूर्ण करणे अनिवार्य राहील.

शारीरिक माप (CM मध्ये) पुरुष स्त्री
उंची 163 150
छाती न फुगवता 79
छाती फुगवून 84
वजन (KG) वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात

अनुसूचित जमातीमध्ये उमेदवारांकरिता (SC/ST) : 

शारीरिक माप (CM मध्ये) पुरुष स्त्री
उंची 152.5 145
छाती न फुगवता 79
छाती फुगवून 84
वजन (KG) वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात

🏃 धावण्याची चाचणी (पुरुष /महिला): 

पुरुष व महिला उमेदवारांची धावण्याची चाचणी होत असताना उमेदवार किती मिनिटात किती किलोमीटर धावतो त्या आंतर व मिनिटांनुसार गुण दिले जातात.

उमेदवार अंतर (KM) वेळ  गुण 
पुरुष 5 कि. मी 30 मिनिटात 80
महिला 3 कि. मी 25 मिनिटात 80

अंतिम निवड व गुणवत्ता यादी  | Van Rakshak Final Selection & Merit List

पात्र असलेल्या उमेदवाराच्या अंतिम निवड साठी वनरक्षक भरतीमध्ये दिलेली ऑनलाइन लेखी परीक्षा गुण व शारीरिक चाचणी परीक्षा या दोघी परीक्षांचे गुण एकत्र करून Final Merit List लावली जाते. त्या मेरिट लिस्ट मध्ये उमेदवाराचे नाव आल्यास त्याची निवड असे समजले जाते. प्रत्येक भरतीनुसार व वर्षानुसार मेरिट लिस्ट चे नियम व मेरिट बदलत असते.

FAQ : Forest Guard Recruitment Question and Answer

Q. महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरती अधिकृत वेबसाईट लिंक?

Ans. https://mahaforest.gov.in/

Q. वनरक्षक ला किती पगार असतो? (Van Rakshak Salary Maharashtra)

Ans. वनरक्षक गट क या पदासाठी सातव्या वेतन आयोगानुसार 21,700 ते 69,100 एवढा पगार असतो.

Q. वनरक्षक भरती फॉर्म भरण्यासाठी किती वयाची आवश्यकता आहे? (Forest Guard recruitment age limit?)

A. उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे जास्तीत जास्त 27 वर्ष प्रवर्गानुसार 3 ते 5 वर्ष सूट दिली जाते.

Q. Van Rakshak Bharti interview द्यावा लागतो का?

A. नाही, वनरक्षक पदासाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत (interview) घेतला जात नाही.

Q. वनरक्षक ऑनलाईन परीक्षेत (CBT) निगेटिव्ह मार्किंग असते का?

A. तर नाही, या भरती परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसते.

1 thought on “Maharashtra Vanrakshak Bharti Selection Process 2025 | महाराष्ट्र वनरक्षक भरती सिलेक्शन प्रोसेस 2025”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top