💂🏻‍♂️ फ्री मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024 -25 करीता ऑनलाईन अर्ज सुरू | Application For Military Bharti Training 2024-25 Mahajyoti Maharashtra

💂🏻‍♂️ फ्री मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024 -25 करीता ऑनलाईन अर्ज सुरू | Application For Military Bharti Training 2024-25 Mahajyoti

Application For Military Bharti Training 2024-25 Mahajyoti Maharashtra – आता मिळेल मोफत मिलिटरी ट्रेनिंग आणि 10,000/- प्रती महिना तसेच एकत्रित आकस्मिक निधी – 12,000/- फक्त एक वेळा मिळेल. अशी एकत्रित रक्कम 72,000/- हजार रु मिळणार. तर मग कश्याची वाट बघताय, तुम्ही जर मिलिटरी भरती साठी तयारी करत असाल तर आता ऑनलाईन अर्ज करा आणि mahajyoti मार्फत मोफत ट्रेनिंग घ्या. अर्ज कसा करायचा, वयाची अट काय आहे?, उंची, छाती व इतर महत्त्वाची संपूर्ण माहिती खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मोफत मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण महा-ज्योती

मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण करीता नॉन क्रिमिलेयर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन 2024 – 25 करीता मिलिटरी भरतीच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

Application For Military Bharti Training 2024-25 Mahajyoti Maharashtra

महाज्योती मार्फत मोफत मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण करीता लागणारी पात्रता तसेच नियम व अटी ऑनलाईन फॉर्म कसा भरावा संपूर्ण माहिती खाली दिली आहे.

प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने
विद्यावेतन 10,000/- प्रतीमाह (75% उपस्थित असल्यास)
एकरकमी आकस्मिक निधी (एक वेळ) 12,000/-

योजनेच्या लाभासाठी पात्रता | Eligibility For Scheme

1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी
2. विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती – भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/ असावी.
3. विद्यार्थी नॉन क्रिमिलेयर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती – भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग गटातील असावा / असावी.
4. विद्यार्थी 12 वी वर्ग पास असावा.
5. महा ज्योतीच्या योजनाचा कोणत्याही स्वरूपात लाभ घेतलेल्या विद्यार्थ्याने चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
6. विद्यार्थ्यांची अंतिम निवड छाननी परिक्षेद्वारे करण्यात येईल.
7. विद्यार्थ्याचे किमान वय 17 वर्ष व व कमाल वय 19 वर्ष पेक्षा जास्त असू नये.

शारीरिक पात्रता (Physical Eligibility)

पुरुष/महीला उंची  छाती
पुरुष 157 सेमी 77 सेमी फुगवून 82 सेमी
महिला 152 सेमी

प्रशिक्षणाकरीता द्यावयाचे अनिवार्य वैद्यकीय मानके

  • उमेदवाराचे शरीर मजबूत आणि चांगले मानसिक आरोग्य चांगले असावे.
  • छातीचा विकास कमीत कमी 5 सेमी विस्तारित असावा (केवळ पुरुषाकरिता)
  • प्रत्येक कानाने सामान्य एकाने आणि दोन्ही डोळ्यामध्ये चांगली दूर दृष्टी असणे आवश्यक. (सैन्य भरती साठी रंग दृष्टी चाचणी CP-III असावी)
  • नैसर्गिक निरोगी हिरड्या आणि दात पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे. (म्हणजेच किमान 14 दांत बिंदू)
  • हाडांची विकृती, हायड्रोसेल आणि व्ह्यारीकोकल किंवा मूळव्याध यांसारखे रोग नसावेत.
  • लाल आणि हिरवा रंग ओळखला पाहिजे. (उपरोक्त सर्व कागदपत्रांची छाननी व अनिवार्य मानकांची तपासणी करूनच प्रशीक्षणाकरीता प्रवेश दिल्या जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

प्रशिक्षणाचे स्वरूप (Nature of Training)

1. विद्यार्थ्यांना मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण तसेच लेखी व शारीरिक परीक्षांचे अभ्यास क्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल
2. सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिने असेल.
3. प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असेल.
4. प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपाचे देण्यात येईल.

आरक्षण (Reservation)

सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढील प्रमाणे
1. अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.
2. प्रवर्ग निहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहेत.

अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | Necessary documents to apply

1. आधार कार्ड (पुढील व मागील बाजू सहित)
2. जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
3. रहिवासी दाखला (Domacile Certificate)
4. वैध नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
5. 10 वी गुणपत्रिका (SSC Marksheet)
6. विद्यार्थी 12 वी वर्गात प्रवेश घेतलेला असावा किंवा 12 वी वर्ग पास केलेला असावा.
7. पासबुक किंवा रद्द केलेला धनादेश (आधार कार्ड असावा)
8. अनाथ प्रमाणपत्र (लागू असल्यास)

आरक्षण | सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढील प्रमाणे

अ. क्र सामाजिक प्रवर्ग टक्केवारी 
1 इतर मागास वर्गीय (OBC) 59%
2 निरधीसूचित जमाती – अ (VJ-A) 10%
3 भटक्या जमाती – ब (NT-B) 8%
4 भटक्या जमाती – क (NT-C) 11%
5 भटक्या जमाती – ड (NT-D) 6%
6 विशेष मागास वर्गीय (SBC) 6%
एकुण 100%

आरक्षण पुढील प्रमाणे

1. अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.

2. प्रवर्गनीहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे.

 

अर्ज कसा करावा | How to Apply For Military Bharti Free Training Mahajyoti

1. महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेस्थळावर जाऊन Notice Board मधील “Application for Military Bharti – 2024-25” यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
2. अर्ज भरतांना काही माहिती ही लाल रंगाच्या ‘*’ चिन्हांचे दर्शविलेली असल्यास ती माहिती उमेदवारांना भरणे बंधनकारक आहे.
3. अर्जासोबत तपशीलात नमूद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे.

🌐 वेबसाईट लिंक Apply Online

ऑनलाईन फॉर्म कसा भरा व्हिडिओ पहा

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख | Last Date for Application

मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2024 आहे.

मेरिट लिस्ट कधी लागेल? | When Military Bharti Free Training 2024 – 25 Merit list Release

मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण साठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर काही फॉर्म जर चुकले असतील तर त्यांना Edit करण्यासाठी वेळ दिला जातो. त्यानंतर काही दिवसांनी मेरिट लिस्ट लागते.

मेरिट लिस्ट कुठे व कशी पहावी? | How to Check Military Bharti Free Training 2024-25 Merit list

मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण निवड यादी म्हणजेच मेरिट लिस्ट तुम्ही महाज्योतीच्या वेबसाईट वरून पाहू शकता.
यासाठी “www.mahajyoti.org.in” वेबसाईट वरती जाऊन “Notice Board वरती क्लिक करून येथे मेरिट लिस्ट पाहू शकता.

अटी व शर्ती (Terms and Conditions)

1. पोस्टाने किंवा ई – मेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही
2. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महा-ज्योती याचे राहतील.
3. चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांक नुसार मेरीताच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी व प्रतिक्षा यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
4. प्रशिक्षणाकरीता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकास संस्थेत प्रशिक्षणाकरिता रुजू होतील त्या दिनांकापासून त्यांना महाज्योतीच्या धोरणानुसार विद्यावेतन लागू होईल. तथापि प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75% उपस्थिती असणाऱ्यांना विद्यावेतन देय राहील.
5. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या तसेच प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्याची आढळल्यास तो/ती कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील.
6. या पूर्वी महाज्योतीच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या “सारथी” या संस्थेकडून योजनेचा लाभ घेतला असल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येईल.
7. या आधी महाज्योतीच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला असल्यास विद्यार्थी या प्रशिक्षणास अपात्र ठरेल.
8. नमूद निकषांची पूर्तता न करणाऱ्या, अपूर्ण अर्ज सादर करणाऱ्या किंवा अर्जासोबत कागदपत्रे न सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अर्ज बाद करण्यात येईल. त्याकरिता विभाग किंवा कार्यालयात जबाबदार राहणार नाही.
9. विद्यार्थ्याचे बँक खाते आधार क्रमांकाची संलग्न असणे आवश्यक आहे.
10. कोणत्याही विद्यार्थ्यास कोणत्याही कारणाने पूर्वलक्षी प्रभावाने विद्यावेतन तसेच आकस्मिक निधी मिळणार नाही.
11. या योजने संबंधित कोणतेही बदल झाल्यास त्याबाबतच्या सूचना वेळोवेळी म महाजोतीच्या संकेतस्थळावर देण्यात येतील.
12. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची क्रांतिक अडचण आल्यास महाजोतीच्या कॉल सेंटर वरती कॉल करावा किंवा ई-मेल वर संपर्क साधावा
संपर्क क्रमांक – 0712-2870120/07122870121
Email ID – mahajyotihelpdesk@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा संस्थेचे संकेतस्थळ Website – www.mahajyoti.org.in

 

27 thoughts on “💂🏻‍♂️ फ्री मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024 -25 करीता ऑनलाईन अर्ज सुरू | Application For Military Bharti Training 2024-25 Mahajyoti Maharashtra”

  1. एक फौजी के रुतबे से बड़ा कोई रूतबा नहीं होता🇮🇳⚔️ वर्दी की शान से बड़ी कोई और शान नाहीं होती🇮🇳⚔️🇮🇳 और अपने देश से बड़ा कोई धर्म नहीं होता⚔️🇮🇳

  2. फ्री मिलिटरी भर्ती परीक्षा घेयन्या साठी आपल्या करीत आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top