Nagapur Mahakosh Bharti 2025 – भावांनो tirmalejob.com नवीन भरती अपडेट घेऊन आले आहेत नागपूर विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती निघाली आहे. 7 व्या वेतन आयोग नुसार 29,200 ते 92,300 पर्यंत दर महा पगार असणार आहे. शिक्षण पात्रता उमेदवार कडे कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी टंकलेखन 30 शब्द प्रती मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रती मिनिट झालेले असावे. आता या भरती बद्दल अधिक माहिती खाली दिली आहे.
Nagapur Mahakosh Bharti 2025
Nagapur Mahakosh Lekha & Koshagar Vibhag, Maharashtra Finance Department Examination 2025. Nagpur Mahakoshagar Vibhag Recruitment for 56 junior Accountant Group Posts All the details about bharti like education qualification salary age limit & Last date is given below.
🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.
📢 भरतीचे नाव – Nagpur Mahakosh Bharti 2025
💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) : कनिष्ठ लेखापाल (गट क)
🤔 एकुण जागा (Total Posts) : 56 जागा
💰 पगार (Salary) : 29,200 ते 92,700 दरम्यान
🧑🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : कोणत्याही शाखेतील पदवी व मराठी टंकलेखन 30 शब्द प्रती मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रती मिनिट
🧒 वयाची अट (Age Limit) : 09 फेब्रुवारी 2025 19 ते 38 वर्ष [मागासवर्गीय अनाथ दुष्काळग्रस्त 5 वर्ष सूट]
🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर
💵 अर्ज शुल्क (Fees) :
खुला प्रवर्ग | 1000/- |
राखीव प्रवर्ग | 900/- |
माझी सैनिक | फी नाही |
🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 09 फेब्रुवारी 2025
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 10 जानेवारी 2025
New Vacancy of Nagpur Mahakosh Bharti 2025
⬇️ जाहिरात (Notification PDF) | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे पहा |
👩💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) | Apply Online |
📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी पदवी मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर
🧑💻 अभ्यासक्रम | Syllabus
मराठी :- सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
इंग्रजी:- Common Vocabulary, Sentence structure, Grammar, Use of idoms and Phrases and their meaning and comprehension of passage.
सामान्यज्ञान :-
1) भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधीमंडळ इत्यादी.
घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावने मागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्ट्ये केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वे-शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ कर्तव्ये, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ, विधानसभा, विधान परीषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्ये, विविध समित्या इत्यादी.
2) आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास –
सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७) महत्वाच्या व्यक्तीचे कार्य, समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमान पत्रे, शिक्षणाचा परीणाम, स्वातंत्र्य पूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी.
3) भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल-
महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक (Physical) भूगोल, मुख्य प्राकृतिक (Physiographic) विभाग, हवामान शास्त्र (Climate) पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, पठार, विविध भूरुपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थानांतर (Migration of Population) व त्याचे उगम (Source) आणि इष्ट स्थानावरील (Destination) परीणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्या व त्यांचे प्रश्न
4) पर्यावरण-
मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरण पूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारचे प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य / राष्ट्र / जागतिक पातळीवरील संघटना / संस्था इत्यादी
5) सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान
अ) भौतिकशास्त्र (Physics) ब) रसायनशास्त्र (Chemistry) क) प्राणिशास्त्र (Zoology) ड) वनस्पतीशास्त्र (Botany) इ) दुरसंवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपाययोजन (Remote Sensing, Aerial & drone Photography, Geographic information system (GIS) and Its application etc) फ) माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (Information & Communiction Tecnology)
6) अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र
१. समग्रलक्षी अर्थशास्त्र
१.१ समग्रलक्षी अर्थशास्त्र १.२. वृध्दी आणि विकास १.३. सार्वजनिक वित्त १.४. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल.
२. भारतीय अर्थव्यवस्था
२.१ भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा. २.२ भारतीय शेती व ग्रामिण विकास २.३ सहकार २.४ मौद्रिक व वित्तीय क्षेत्र २.५ सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था २.६ उद्योग व सेवाक्षेत्र २.७ पायाभूत सुविधा विकास २.८ आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल २.९ महाराष्ट्राची अर्थव्यवस्था
7) चालू घडामोडी
जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील
8) माहिती अधिकार अधिनियम २००५ (As updated)
बुध्दिमापन चाचणी
१) सामान्य बुध्दिमापन व आकलन
उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न
२) अंकगणित व सांख्यिको
बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दर्शाश, अपूर्णांक, टक्केवारी इत्यादी