11th Admission Maharashtra 2025 FYJC Online Form Registration – विद्यार्थी मित्रांनो जर का तुम्ही 2025 मध्ये 10 वी पास झाले असाल आणि इयत्ता अकरावीला ऍडमिशन घ्यायचं असेल. सध्याच्या नवीन नियमानुसार 11 वी ऍडमिशन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरला जातो. तर शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी अकरावीचे ऑनलाईन ऍडमिशन फॉर्म भरणे सुरू झाले आहे. 11 वी ऍडमिशन फॉर्म कसा भरायचा संपूर्ण माहिती खाली दिली आहे.
11th admission maharashtra 2025 Date and Time Table
इयत्ता अकरावी एडमिशन आर्थिक वर्ष 2025-26 वेळापत्रक खालील प्रमाणे.
अर्ज सुरू होण्याची तारीख | 26 मे 2025 (सकाळी 11:00 वा) |
अर्जाची शेवटची तारीख | 03 जून 2025 (सायंकाळी 6:00 वा) |
तात्पुरती गुणवत्ता यादी | 05 जून 2025 रोजी |
तात्पुरती गुणवत्ता यादी बद्दल हार्दिक अभिनंदन | 06 ते 7 जून 2025 |
अंतिम गुणवत्ता यादी (Merit List) | 08 जून 2025 |
शून्य फेरी प्रवेश | 09 ते 11 जून 2025 |
Documents Required for 11th Admission in Maharashtra 2025 | आवश्यक कागदपत्रे
सध्या इयत्ता अकरावीचे ऑनलाईन ऍडमिशन फॉर्म सुरू झाले आहेत. ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे.
1 | 10 वी गुणपत्रक (SSC Marksheet) |
2 | शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate) |
3 | नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट (Non creamy layer certificate) |
4 | जातीचा दाखला (Caste Certificate) |
5 | स्वयंघोषणापत्र (Self Declaration) हमी पत्र |
FYJC Maharashtra 11th Admission Form Fill Up Process | 11 वी ऍडमिशन फॉर्म कसा भरावा
तुम्हाला 11 वी Admission घ्यायचं असेल, तर तुम्हाला ऑनलाईन ऍडमिशन फॉर्म भरावा लागेल. तर fyjc online admission form भरण्याचा part 1 & part 2 online Admission form for 11th std सरळ आणि सोप्या भाषेत व्हिडिओ खाली दिला आहे.
Maharashtra 11th Admission Registration Website Link | अर्ज करण्याची वेबसाईट
अर्ज करण्याची वेबसाईट | mahafyjcadmissions.in |
अर्ज करण्याचा व्हिडिओ | 11th fyjc Admission form |
11th Admission Maharashtra 2025 Self Declaration Form PDF | हमीपत्र स्वयंघोषणापत्र
इयत्ता अकरावीचा ऑनलाइन फॉर्म भरत असताना जर का विद्यार्थ्याकडे पूर्ण कागदपत्रे नसतील तर त्यांना हमीपत्र त्याला स्वयंघोषणापत्र असे म्हटले जाते ते सादर करावे लागेल म्हणजेच अपलोड करावे लागेल. हमीपत्र कसे भरावे त्याचा Demo Sample फॉर्म तसेच Self declaration form PDF खाली देण्यात आले आहे.
Self declaration कसे भरावे | डाउनलोड Sample |
Self Declaration Form PDF | Download |
11th Jr Colleges कसे सर्च करायचे| Search 11th Jr. College in Your Area
अकरावी ऍडमिशन फॉर्म भरण्यापूर्वी तुम्ही कॉलेज सर्च करू शकता. आणि चेक करू शकता की त्या कॉलेजमध्ये कोणते विषय आहेत त्या कॉलेज साठी किती फी आहे. तुमच्या आज जवळील तालुका किंवा जिल्ह्यामध्ये चांगली कॉलेज आहे का. तुमच्या तालुक्यामध्ये अनुदानित, विनाअनुदानित, प्रायव्हेट, सरकारी, partially अनुदानित कॉलेज कोणत्या व किती आहेत. अशी सर्व माहिती चेक करू शकता.
1) Aided – अनुदानित शाळा ( Admission Fee कमी असते)
2) Government/Local Body – सरकारी शाळा किंवा सरकार मान्य शाळा (Fee कमी असते किंवा नसते)
3) Partially Aided (20% – 80%) – काही टक्के अनुदानित असलेल्या शाळा (अनुदानित शाळांपेक्षा थोडी Fee जास्त असते)
4) Self Financed – प्रायव्हेट (Fee खूपच जास्त असते)
5) Un- Aided – विनाअनुदानित शाळा (प्रायव्हेट शाळांपेक्षा थोडी Admission Fee कमी असते)
11th Admission साठी किती मेरिट लिस्ट लागतील.
ऍडमिशन फॉर्म भरताना आणि कॉलेज निवडताना काळजीपूर्वक निवडा. कारण अकरावी एडमिशन साठी फक्त एकच मेरिट लिस्ट लागते. आणि ज्या कॉलेज साठी तुमची निवड झाली त्याला ऍडमिशन घ्यावंच लागतं. त्यामुळे या कॉलेजला ऍडमिशन घेण्याची इच्छा आहे त्याला पहिल्या क्रमांकावर ते ठवा. नंतर ऑप्शनला बाकी कॉलेज ठेवा. नंतर फॉर्म एडिट करता येत नाही. त्यामुळे या गोष्टींची काळजी नक्की घ्या.
फॉर्म भरत्यावेळी कागदपत्रे नसेल तर काय करावे?
इयत्ता अकरावीचा ऑनलाईन ऍडमिशन फॉर्म भरताना तुमच्याकडे जातीचा दाखला नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही हमीपत्र भरून त्यामध्ये त्याचा उल्लेख करू शकता. आणि मेरिट लिस्ट मध्ये नाव आल्यावर ऍडमिशन घेत्यावेळी ते कागदपत्रे सादर करावे लागतील. त्याबद्दल माहिती वरचे सुद्धा दिले आहे. फॉर्म भरल्यानंतर विहित कालावधीत ते कागदपत्रे तुम्ही काढून घ्यायची आहेत.
11th Admission Form Filling Problem Payment Fail Pending Problem Solve
ऑनलाइन एडमिशन फॉर्म भरताना खूप विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहे. याचे कारण म्हणजे एकाच वेळी खूप जास्त विद्यार्थी वेबसाईट वरती फॉर्म भरत आहे त्यामुळे वेबसाईट सर्वर डाऊन होत आहेत त्यामुळे वेबसाईट बरोबर चालत नाहीये.
महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे Admission Form Fee Payment Fail, Pending प्रॉब्लेम येत आहे. हा प्रॉब्लेम सुद्धा वेबसाईट सर्व डाऊन होत असल्यामुळे येत आहे. जर का एकदा Payment Fail किंवा Payment Pending झाली. तर 24 तास वाट पाहा त्यानंतर पुन्हा प्रयत्न करा. याबाबतच्या सूचना स्वतः प्रशासनाने वेबसाईट वरती दिल्या आहेत.
Sangmner
Khadki sukli
District. Yavatmal taluka. Ralegaon khadki sukli