📄 पोलीस भरती डॉक्युमेंट लिस्ट PDF डाउनलोड करा | Police Bharti Documents 2024 Marathi PDF Download

Police Bharti Documents 2024 Marathi PDF Download

Police Bharti documents 2024 marathi pdf download – पोलीस भरती साठी फॉर्म भरतांना व निवड झाल्यावर Verification साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती त्याची पूर्ण लिस्ट खाली दिली आहे. करा मुलं भरती निघाल्या नंतर विचार करतात, की आता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील. तसेच भरती मध्ये निवड झाल्यावर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी कोणते कागदपत्रे लागतात त्याचा विचार करतात. पण तेव्हा खूप घाई गरबड होते आणि ऐन वेळेस कागदपत्रे निघत नाही. त्यामुळेच तुमच्यासाठी कागदपत्रांची पूर्ण लिस्ट व मोफत pdf download करण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Police Bharti documents 2024 marathi pdf download

पोलीस भरती निघाल्यावर उमेदवारांना माहीतच नसते की, अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील. तसेच पोलीस भरतीमध्ये निवड झाल्यावर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी लागणारे कागदपत्रे खाली देण्यात आले आहेत.

पोलीस भरती ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागणारे कागदपत्रे

Police Bharti Documents List In Marathi
आधार कार्ड (Aadhar card)
10 वी 12 वी मार्कशिट (10th & 12th Marksheet)
पदवी पर्यंत शिक्षण झाले असेल तर त्याचे मार्कशिट
ईमेल आयडी (Email ID)
मोबाईल नंबर (Mobile Number)
फोटो आणि सही (Photo & Sign)
💁 सूचना – वरील पैकी फक्त फोटो आणि सही अपलोड करावी लागेल बाकी कागदपत्रे फक्त फॉर्म भरतांना जवळ असावे

 

पोलीस भरती मध्ये निवड झाल्यावर लागणारे कागदपत्रे | | Police Bharti Documents List For Verification

Police Bharti Required Documents For Verification
12 वी पास मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट
पदवीधर असल्यास, प्रथम वर्ष द्वितीय वर्ष तृतीय वर्ष गुणपत्रक (असल्यास)
मुक्त विद्यापीठाच्या पदवीचे प्रथम वर्ष/ द्वितीय वर्ष/ द्वितीय वर्ष गुणपत्रक (असल्यास)
पद्वित्तीर्ण पदवी असल्यास प्रथम वर्ष /द्वितीय वर्ष/ द्वितीय वर्ष गुणपत्रक (असल्यास)
ITI/डिप्लोमा मार्कशीट
शाळा सोडल्याचा दाखला
शाळा शिकत असल्यास बोनाफाईड सर्टिफिकेट
जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
वयाचा दाखला (Age Certificate)
अधिवास प्रमाणपत्र (Domacile Certificate)
नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट (Non Cream layer)
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र (EWS)
खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवार करिता 30 टक्के आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र
प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र (असल्यास)
भूकंपग्रस्त प्रमाणपत्र (असल्यास)
विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र
वडील पोलीस असल्यास त्याचे प्रमाणपत्र (असल्यास)
होमगार्ड प्रमाणपत्र (असल्यास
आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन
माजी सैनिक उमेदवाराचे डिस्चार्ज कार्ड ओळखपत्र (असल्यास)
माजी सैनिक उमेदवाराचे आर्मी एज्युकेशन (असल्यास)
चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (निवड झाल्यावर लागेल)

💁 महत्वाचे – 

  • जे डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल ते काढून घ्या
  • सर्व कागदपत्रांवर नाव व जन्म तारीख सारखी पाहिजे. जर एखाद्या डॉक्युमेंट मध्ये बरोबर नसेल तर नवीन काढा किंवा Update करा.

📢 सूचना – ज्या ठिकाणी “असल्यास” असे लिहिले आहे याचा अर्थ तुम्ही त्या गटात मोडत असाल किंवा तुम्ही फॉर्म भरतांना ती बाब होय केली असेल तर ते डॉक्युमेंट लागेल, नाहीतर लागणार नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top